विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस न्यूज
मुंबई : राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी जाहीर भरतीला प्रशासकीय पोलीस भरतीला कारणामुळे स्थगिती दिली असून पुढे ढकलण्यात आली आहे. असे आदेश महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व खास पथकाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत.
पुढील महिन्यात १४ हजार ९५६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आज शनिवारी (ता. २९) ला एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रामध्ये सन २०२१ मध्ये पोलीस कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे. तसेच पोलिस भरती संदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. असे परिपत्रकात सांगितले आहे.


إرسال تعليق