शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ऊस तोडणी कामगारांना दिवाळी निमित्ताने फराळ वाटप...... शैलेंद्र बेल्हेकर


 पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक : कष्टकरी समाज बांधव राबराब राबतात त्यांच्या श्रमाने, घामाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखाचा गोडवा येतो. म्हणून आपल्यातला एक गोड घास त्यांना देऊन दिवाळी सणाचा गोडवा प्रत्येक श्रमिकाच्या चेहऱ्यावर फुलू या असे अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र  बेल्हेकर यांनी सांगितले.

          संस्थेच्या वतीने धुळे नंदुरबार जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांना दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडू चिवडा वाटप करण्यात आला. यावेळी बेल्हेकर बोलत होते. ऊस तोडणी कामगार, महिला त्यांची चिमुकली मुले यांना त्यांच्या मांजरी खुर्द येथील पालावर जाऊन ह्या फराळाचे वाटप करण्यात आले. 

           संस्थेच्या वतीने मांजरी बुद्रुक परिसरातील दिव्यांग बांधवांना सुद्धा लाडू चिवडा वाटप करण्यात आले. मिनाक्षी कुमकर, अतुल रासकर, सचिन मोरे, ओजस बेल्हेकर, सुनिल ठाकरे, विकास गायकवाड, अशोक आव्हाळे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

Post a Comment

أحدث أقدم