पुणे : सिंहगडावर दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे कुटुंबीय, मित्र परिवाराने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंगा थीम घेऊन आकर्षक पद्धतीने आणि विद्युत रोषणाईच्या दीपोत्सव उत्साहात साजरा झाला. सह्याद्रीतील गडकिल्ले महाराष्ट्राचे सांस्कृतीक वैभव व अलंकार आहेत. या पार्श्वभूमीवर गडकोटावर दीपोत्सव साजरे करण्याची सुरवात झाली आहे. साधारणत १२ वर्षांपुर्वी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी महाराष्ट्र दिनाचे दिवशी गडाला विद्युत रोषणाई केली होती. त्यानंतर वांजळे कुटूंबाने यंदा सिंहगड अधिक प्रकाशमय झाला होता. सिंहगडचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर यांची विशेष उपस्थिती होती. माजी नगरसेविका सायली वांजळे व युवक कार्यकर्ते मयुरेश वांजळे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.
वाहनतळा पासून गडाच्या तिसऱ्या दरवाजापर्यत रोषणाई केली होती. गड परिसरातील गर्द हिरवी झाडी आणि कड्यांची शोभा वाढली होती.आधुनिक लाईट द्वारे रंगीबेरंगी प्रकाशझोत वापरल्याने दुरदर्शनचा गडावरील उंच मनोरा काही किलोमीटर अंतरावरून देखील लक्ष वेधुन घेत होता. शहराच्या काही भागातून उजळलेला सिंहगडाच्या दिशेने तर दुसऱ्या दिवशी आतकरवाडी येथून सिंहगडच्या दिशेने तर दुसऱ्या दिवशी वाहनतळावरील ऊंच कड्यावर लेझर लाईटद्वारे घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे, दिवंगत आमदार रमेश वांजळे आणि दिवाळीचा शुभेच्छा संदेश दिला होता. हे दृष्य पहाण्यासाठी पर्यटक शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली , होती.
राज्य पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक विलास, वनविभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील, घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका पढेर, उपसरपंच गणेश गोफणे, तसेच महावितरण, हवेली पोलिस या शासकीय विभागाचे आणि वनसंरक्षण समिती घेरा सिंहगड व स्थानिक ग्रामस्थांमध्ये माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, माजी उपसरपंच अमोल पढेर आमच्या या स्तुत्य उपक्रमासाठी चांगले सहकार्य लाभले विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे शुक्राचार्य वांजळे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित केला होता. असे मयुरेश वांजळे यांनी सांगितले. गडकिल्ले हा एक अमुल्य ठेवा आहे. तो नव्या पिढीचे मनात रुजविण्यासाठी आपण सण- उत्सव साजरे करत असताना आपण शिवराय आणि त्यांच्या सहकारी पराक्रमी मावळ्यांचे स्मरण करून गडसंवर्धनाचे कार्य हाती घेतले पाहीजे. असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले आहे. असे सायली वांजळे, माजी नगरसेविका म्हणाल्या......



إرسال تعليق