सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. खेड) : स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ३ गावठी पिस्टल, ६ मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त करीत २ आरोपीना केले जेरबंद___
दि.२०/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या आदेशाने खेड राजगुरुनगर या परिसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना सदर पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम काळया रंगाचे बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याचे समजले.
या बातमीची खात्री करून घेण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन बुलेट गाडीवरील २ इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे (१) आकाश आण्णा भोकसे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे,(२) महेश बाबाजी नलावडे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे. असे सांगीतले.
तसेच त्यांची झडती घेतली असता आकाश याचे कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले तसेच त्याचे पॅन्ट च्या खिशात २ मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. तसेच त्याचा मित्र महेश याचे याचे कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले व त्याचे पॅन्ट च्या खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली.
वरील दोन्ही ईसमंकडून ३ गावठी पिस्टल आणि ३मॅकझीन प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टल मधे प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेली अवस्थेत मिळून आली (१) आकाश अण्णा भोकसे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे (२) महेश बाबाजी नलावडे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे यांचे ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझिन सह काळया रंगाचे. की. अं .रू = ३५,०००
एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह काळया रंगाचे. की. अं .रू = ३५,०००
एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह सिल्वर रंगाचे. की. अं .रू = ३५,०००
३० जिवंत काडतुसे की अं रू = ३०००
एक काळया रंगाची नंबर नसलेली बुलेट मोटार सायकल की अं रू ५०,०००
३ रिकाम्या मॅकझीन की अं रू =३००० असा एकूण १ लाख ६१ हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी यांचे विरूद्ध सरकारतर्फे फिर्याद देऊन आर्म ॲक्ट ३, २५ नुसार खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदरील आरोपी यांना मुद्देमाल सह पुढील तपास कामी खेड पोलीस स्टेशन चे ताब्यात दिले आहे.
वरील कारवाई ही मा पोलीस अधिक्षक सो अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस उपअधीक्षक श्री सुदर्शन पाटील यांचे मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स पो नी नेताजी गंधारे, पो स ई शिवाजी ननवरे, पो स ई गणेश जगदाळे, पो हवा विक्रमसिंह तापकीर, पो हवा विजय कांचन, पो ना अमोल शेडगे, पो ना बाळासाहेब खडके, पो शि धिरज जाधव, पो शि निलेश सुपेकर, पो शि दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे

إرسال تعليق