शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मानवाधिकार फाऊंडेशन तर्फे संविधान उद्देशीका प्रतिमा भेट____


 प्रतिनिधी-भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर (ता. मोखाडा) - जि.प.उच्च प्राथमिक शाळा मोरखडक ता. मोखाडा येथे मानवाधिकार फाउंडेशन तर्फे संविधान उद्देशीका प्रतिमा भेट देण्यात आल्या. संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी संविधान उद्देशीकेचे वाचन केले. व विद्यार्थ्यांना कोणतीही शैक्षणिक अडचण असल्यास मानवाधिकार फाउंडेशन  व पत्रकार मकरंद बात्रे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगितले. 

            यावेळी मुख्याध्यापक बिनर सर यांनी पत्रकार मकरंद बात्रे यांचे पुष्पगुछ व शाल देऊन स्वागत केले. तसेच मानवाधिकार फाउंडेशनचे मोखाडा तालुका अध्यक्ष भाऊ वैजल, यांचे वाणी सर व उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी यांचे देसले सरांनी पुष्पगुछ व शाल देऊन स्वागत केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कुंती आत्माराम खाडम, कविता गामणे, कलदुर्गे सर, व पाटील सर कार्यक्रमात उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم