महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : लोणीकाळभोर पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये (दि. ०३) रोजी पहाटे ३:२५ ते ४:०० वा च्या दरम्यान ऊरुळीकांचन गावच्या हद्दीत पुणे सोलापुर हायवे लगत सोनाई हॉटेलचे शेजारी ता. हवेली, जि. पुणे येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन फोडुन त्यातील रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न आरोपीतांनी केला होता.
सिक्युरीटी कंपनीचे झोनल मॅनेजर कृष्णा काशीनाथ गोळे यांच्या तक्रारी वरुन लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीवर गु र नं. ५७३/२०२२, भा. द. वि. कलम ४५७, ३८०, ५११, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तपास पथकातील पोउपनि अमित गोरे व पोलीस अंमलदार यांना तपास करण्याच्या सूचना केल्या. फरार आरोपीतांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई दिपक सोनवणे यांना त्याचे बातमीदारा मार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा ऊरुळीकांचन शिंदवणे चौक येथे येणार आहे. अशी माहिती पोउपनि गोरे यांना कळवले असता त्यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक कळवून पोहवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पोना नागलोत, पो ना जाधव, पोशि कुदळे, पोशि पुंडे, पोशि सोनवणे यांनी जाऊन शिंदवणे चौक येथे सापळा रचुन थांबले असता १९:०० वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एक इसम शिंदवणे चौकात आला त्यावेळी पोउपनि गोरे यांनी वरील स्टाफचे मदतीने आरोपीस ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव (१) अजय रामचंद्र ठवरे वय २१ वर्षे रा. पुरंदर सोसायटी फ्लॅट नं ३०७, ऊरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगितले.
हा गुन्हा त्याने त्याचा मित्र सुमित दिलीप बलगाडे याच्या सोबत केल्याचे कबुल केल्याने आरोपीने सांगीतल्या प्रमाणे दुसरा आरोपी सुमित बलगाडे याचे राहते घरी जावन त्यास ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपीने संगणमत मताने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
पकडलेले आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि गोरे, लोणीकाळभोर पो स्टे पुणे हे करत आहेत.
ही उल्लेखनीय कामगीरी अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. विक्रांत देशमुख पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ - ५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि अमित गोरे व त्यांचे सोबत पोहवा नितीन गायकवाड, पोहचा आनंद पाटोळे, पोना सुनिल नागलोत, पो ना श्रीनाथ जाधव, पो ना संभाजी देवीकर, पोशि नितेश पुंडे, पोशि शैलेश कुदळे, पोशि दिपक सोनवणे, पोशि निखील पवार, पोशि बाजीराव वीर यांचे पथकाने केली आहे.


إرسال تعليق