सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळवाडी, हडपसर येथे मंगळवार (दि. २९) रोजी ४ वाजता हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने दामिनी पथक व सखी मंच १ स्टॉप सेंटर यांच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी हडपसर पोलीस स्टेशन चे गोपनीय विभागाचे ASI दिनेश शिंदे व मपोशी वैशाली शहादेव उदमले दामिनी पथक हडपसर मुंढवा व शुभांगी घरबुडे सखी मंच वन स्टॉप सेंटर मुंडवा. शहादेव उदमले सहशिक्षक रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय, शेवाळवाडी गावातील पोलीस पाटील अमृता खेडेकर व त्यांचे पती आनंदा खेडेकर शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर व सर्व शिक्षक व शिक्षिका कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
सदर कार्यशाळे मध्ये ५ वी ते ७ वी च्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यशाळेमध्ये मुलींना स्वसंरक्षणार्थ मार्गदर्शनवर धडे देण्यात आले. तसेच गुड टच बॅड टच, अनोळखी व्यक्ती त्रास देत असेल तर, बालकांचे हक्क लैंगिक शोषण अनुषंगाने पोस्को कायदा यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.


إرسال تعليق