शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मोखाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मॅरेथॉन मध्ये घवघवीत यश संपन्न__


 प्रतिनिधी-भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर (ता. मोखाडा) : हरसूल जि.नाशिक येथे रण मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी मोखाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 

१)माणिक वाघ ६ कि.मी.(२ रा ) क्रमांक

२) अजय माशी १ कि.मी. (१ ला) क्रमांक

३) नेहा गहले १ कि.मी. (२ रा) क्रमांक मिळवलेला आहे.

कु. अजय माशी व कु. नेहा गहले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमवाडी या शाळेचे विद्यार्थी आहेत. भालचंद्र धनगरे व प्रकाश पाटील सरांनी  या मुलांची नेहमी तयारी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. खोच ग्रामपंचायत सदस्य सुभाष गहले, मनोज हिलीम यांचे ही मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले म्हणून आज लहान मुलांनी यश संपादन केले आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم