सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : हडपसर पोलीस स्टेशनचे दामिनी पथक सखी मंच वन स्टॉप सेंटर मुंढवा शेवाळेवाडी येथील ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्यात आले. (दि. २९) रोजी सायंकाळी ६ वा. हनुमान मंदिर मंडप शेवाळेवाडी येथे हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने दामिनी पथक वैशाली उदमले, शुभांगी घरबुडे केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर मुंढवा पुणे व शहादेव उदमले सहशिक्षक रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय आदर्शनगर व पोलीस पाटील अमृता खेडेकर व त्यांचे पती आनंदा खेडेकर शेवाळे वाडीतील सर्व ज्येष्ठ नागरीक महिला व पुरुष कार्यक्रमास उपस्थित होत्या.
मान्यवरांनी सर्व ज्येष्ठ मान्यवरांना मार्गदर्शन केले .आरोग्याची काळजी, मित्रांच्या गाठीभेटी घेणे, ऑनलाइन फसवणूक, मोबाईल वरती येणारे बँके संदर्भात चे फोन, ओटीपी किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर, फोन द्वारे न देणे, काही अडचण असल्यास हेल्पलाइन नंबर वरती संपर्क साधने, याबाबत सर्व माहिती ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा शेवाळवाडी गावचे पोलीस पाटील यांनी गुलाब पुष्प श्रीफळ देऊन सत्कार संपन्न केला.


إرسال تعليق