शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नव्वद कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेसह तब्बल सव्वाशे कोटींच्या विकास कामे__ नवपरिवर्तन पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (ता. हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या मतदारांनी पाच वर्षापुर्वी सत्ता दिल्याने, सर्वांना विश्वासात घेऊन मागील पाच वर्षाच्या काळात सुमारे नव्वद कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेसह इतर सव्वाशे कोटींच्या आसपास विविध विकास कामे मार्गी लावली आहेत.

          तर आगामी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत पाच वर्षात रस्ते, पाणी, वीज, अत्याधुनिक जीम, ओपन जीम, स्मशानभूमी, हायमास्टचे दिवे, स्ट्रीट लाईट अशा विविध सोयी-सुविधांचा डोंगर उभा केला जाणार आहे. प्रचार करत असताना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पहाता, सरपंचपदा बरोबर नवपरीवर्तण पॅनेलच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने नागरिक मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख व सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले.

            पाठीमागच्या कार्यकाळात विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे राजकारण करताना आम्ही कधीच हेवेदावे केलेले नाहीत, आणि भविष्यात करणार नाही. नवपरीवर्तन पॅनेलला प्रतिसाद पाहुन, विरोधक फक्त टिका करत आहेत. ग्रामपंचायत मधील कार्यकर्ते हिच माझी ताकद सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. याच आत्मविश्वासाने सर्व नागरिकांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायत मधील विकास करण्यासाठी जनता जनार्दन येत्या रविवारी (१८ तारखेला) मतदानातुन विरोधकांना उत्तर देतील. असे सरपंचाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. 

           कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला असुन, गौरी गायकवाड यांच्या काळात झालेली विविध विकास कामे मतदारांच्या समोर ठेऊन, आगामी काळात पाच वर्षासाठी सत्ता द्यावी असे आवाहनही सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी मतदारांना केले. यावेळी "महाराष्ट्र पोलीस न्यूज" शी बोलतांना सरपंचपदासह नवपरीवर्तण पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला.



          मागील पाच वर्षाच्या झालेली विकास कामे पहाता, मतदारांनी सत्ता दिल्यास, पुढील पाच वर्षात मतदार यांना हेवा वाटेल असे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत शहरासारखी स्वच्छ व सोईसुविधांच्या बाबतीत राज्यात अग्रणी ग्रामपंचायत बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी स्पष्ट केले.



(कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच गौरी गायकवाड)

        

        म्हणाल्या, कोरोनाच्या काळात आम्ही व आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन, नागरीकांच्यासाठी काम करत असताना दीड हजारांपेक्षा जास्त नागरीकांना अन्नधान्य वाटप केले. पाढीमागील पाच वर्षाच्या काळात रस्त्यावर उतरुन कामे केल्याने, गावात कोणाच्याही सुख-दुःखात सहभागी होणारे असाधारण नेतृत्व म्हणजे चित्तरंजन नाना गायकवाड अशी ओळख कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मध्ये निर्माण झाली. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असेही मागील काळातील सरपंच गौरी गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.


      (कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच देविदास काळभोर म्हणाले) 


माजी सरपंच गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील पाच वर्षात पाणी पुरवठा योजनेसह सव्वाशे कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. कदमवाकवस्ती मध्ये पाणी पुवठा योजना पुरवठा पुर्ण झाल्यावर नागरीकांना चोविस तास पाणी मिळणार आहे. मतदारांनी आपल्या गावाचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी नवपरीवर्तन पॅनेललाच निवडुन द्यावे.

Post a Comment

أحدث أقدم