शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

२ गावठी पिस्तूलासह जिवंत काडतुसे जप्त__

सुशीलकुमार अडागळे

महाराष्ट्र पोलिस न्युज

 

 पुणे (ता. बारामती) : माळेगाव पोलीस स्टेशनची दमदार कामगीरी एका आरोपीसह २ गावठी पिस्तूल व १ जिवंत काडतुसे जप्त. 

         मागील काही दिवसापासून पुणे जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी गुन्हयाचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये अग्निशस्त्र जप्ती करणेकामी कोम्बींग ऑपरेशन तसेच अभिलेखावरील संशयित आरोपीची वाहन झडती तसेच घरझडतीचे अभियान चालु होते. 

         त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी आपल्या पथकाला सोबत घेवुन गावठी पिस्तूलाची शोध मोहीम हाती घेतली. हद्दीतील संशयित आरोपीचे तपासणी परिसरात करत असताना माळेगाव पोलीस स्टेशनचे हद्दितील लकडेनगर येथील एका इसमाचा सोशल मिडीया वरील व्हिडीओ पथकातील पोलीस अंमलदार राहुल पांढरे व विजय वाघमोडे यांना प्राप्त झाला.

         त्यानुसार पथकातील पोसई साळवे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमाडे, ज्ञानेश्वर मोरे यानी खबर्या मार्फत माहिती प्राप्त केली. 

           खबर्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार (ता. २५) रोजी दुपारी २२/३० वाजेच्या सुमारास आरोपी माळेगाव पिरबाब दर्गा मैदान येथे एक इसम गावठी पिस्तूल विक्री करणेकरीता येणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. 

        पोलीस निरीक्षक किरण अवचरे यांनी पथकाला  सुचना करुन कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथक रवाना होऊन माळेगाव पिरबाब दर्गा मैदान येथे सापळा रचुन बसले असता त्यावेळी एक व्यक्ती संशयीत हालचाली करताना दिसला. त्याला पकडून त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव आकाश सुरेश हजारे सांगितले वय (२४) वर्षे (मुळगाव रा शिंदेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर) सध्या रा. लकडेनगर माळेगाव ता.बारामती जि.पुणे असे सांगितले असुन सदर सोशल मिडीया वरील व्हिडीओ हा सदर इसमाचा असलेबाबत खात्री झाली. त्याची अंगझडती घेतली असता ५०,०००/- रुपये किमतीचे २ गावठी पिस्तूल अनुक्रमे काळे व सिल्वर रंगाचे बाजुस लाल रंगाची पट्टी असलेले लोखंडी धातुचे मॅगझीन सह किंमत अंदाजे ३०० /- रुपये किंमतीचे एक जिंवत काडतुस त्याचे पाठिमागील बाजुस पितळी ७.६५ के एफ मार्क कि अं. ५०,३०० रुपये किंमतीचे २ गावठी पिस्टल १ जीवंत काडतुस जप्त करुन आरोपी याचे वर भारतीय शस्त्र अधिनियम ३ (२५), ५ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम क. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

            सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक अंकित गोयल. अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे विषेश पथकातील पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, सहा. फौजदार जयवंत ताकवणे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, नंदकुमार गव्हाणे, जयसिंग कचरे यांनी केली आहे.

        गुन्हयाचा अधिक तपास पोसई देविदास साळवे हे करीत आहेत.

 

Post a Comment

أحدث أقدم