शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माजी विद्यार्थी यांचा मेळावा__१९९१ या वर्षाची १० वीची बॅच__लोणी काळभोर__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. 

          यामध्ये १० वी वर्गातील १९९१ या वर्षाच्या माजी विद्यार्थी यांचा मेळावा थाटात संपन्न झाला. या प्रसंगी, डायस, व म्युझिक सिस्टीम भेट देण्यात आली. माजी विद्यार्थी यांचा मेळावा होत असल्याने या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक यांना ही या मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थी यांनी शिक्षकांचे आशिर्वाद ही घेतले. 

           पाटील सर, नाईक सर , झाम्बरे सर, नामुगडे सर, यानी माजी विद्यार्थी यांना मार्गदर्शन व आशिर्वाद दिले. या विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी राजकारणी, डॉक्टर, शिक्षक, उद्योजक, साहित्यिक, अशा सर्वांचीच असणारी उपस्तिथी महत्वाची ठरली. 

             यावेळी दिवंगत माजी प्राचार्य राम सुळगेकर, प्रभा सुळगेकर, राकेश काळभोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी स्पिच बाॅक्स व म्युझिक सिस्टीम प्राचार्य सीताराम गवळी यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी कल्पना बोरकर, संजीवनी बोरकर उपस्थित होते.

            याकरिता सुनीता तिवारी, सचिन राठी, अमोल दुगाने, गणेश कुंभारक, स्वाती सासवडकर, गजानन मुळे शिवदास आणि विद्यार्थी मित्र मैत्रीनिंचे मिळालेले सहकार्य लाख मोलाचे आहे,

          या मेळाव्याचे आभार, सुनीता तिवारी-मिश्रा, हिने मानले, व कार्यक्रमाची सांगता झाली, असी माहिती विकास तिखे यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم