रणजीत दूपारगोडे
महाराष्ट्र पोलीस न्युज
मुंबई :- ठाणे येथील बौद्ध प्रगती मंडळाच्या बौद्ध विहारांच्या सभागृहात काष्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक धर्मपाल ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये काष्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून धर्मपाल ताकसांडे (वर्धा) यांची बहुमताने फेर निवड करण्यात आली. सरचिटणीस म्हणुन सुनील निरभवने (मुंबई) यांची बहुमताने फेर निवड करण्यात आली.
कोषाध्यक्ष पदी वर्ध्याचे रविंद्र मांडवे (वर्धा) यांची आवाजी मताने पुन्हा एकदा निवड करण्यात आली. उर्वरित केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार निवड झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांना सर्वानुमते देण्याचे ठरले आहे. यानंतर बैठकीतील विषय पत्रिकेनुसार विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन मागील सर्व विषयांचे वाचन करून सर्वांच्या सहमतीने आवाजी मतांनी ठराव मंजूर करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आली.
सदरच्या बैठकीत महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील काष्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे प्रमुख विभागीय अध्यक्ष / सचिव, तालुक्यातील आगारातील अध्यक्ष / सचिव व इतर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सखोल विचार विनिमय करून बाकी राहिलेल्या जिल्ह्यातील विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन त्याची माहिती केंद्रीय कार्यकारिणीस सादर करण्यात यावी असे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे व सरचिटणीस सुनील निरभवने यांनी सांगितले आहे.
यानंतर नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे मुंबई, राज्याचे महाव्यवस्थापक (क व औ सं ) अजित गायकवाड यांना समक्ष भेट घेऊन निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी सादर करण्यात आली.
यावेळी धर्मपाल ताकसांडे, सुनील निरभवने, रविंद्र मांडवे, गणेश कांबळे (नांदेड) विजय नंदागवळी तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध भागांतील कर्मचारी उपस्थित होते. असे नवनियुक्त सरचिटणीस सुनील निरभवने यांनी अशी माहिती दिली आहे.

إرسال تعليق