शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
मुंबई : कलाकार तुनिषा शर्माचा प्रियकर व सहकलाकार शिझान खान याने शर्मा सोबतचे प्रेमसंबध तोडले होते. शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने निराश झालेल्या तुनिषाने आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद तुनिषाच्या आईने वालीव पोलिस ठाण्यात दिली आहे. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर शिझान खानला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने बालकलाकार म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे. तुनिषाने विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल' या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती.
या मालिकेचे चित्रिकरण वसई पूर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. याचदरम्यान, अभिनेत्री तुनिषाने वसईतील स्टुडियोमधील मेकअप रूममध्ये शनिवारी (ता. २४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.
यावर बोलताना साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव म्हणाले कि, मीरा रोड येथे राहणाऱ्या तुनिषाचे अभिनेता शिझान खान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी फिर्याद तुनिषाच्या आईने दिली होती. त्या फिर्यादीवरून आम्ही झिशानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तुनिषाचा प्रियकर शिझान खानला रात्री उशीरा अटक केली आहे.

إرسال تعليق