शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वडगाव निंबाळकर पोलीसांची कारवाई : गावठी हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले__


 सुशीलकुमार अडागळे 

महाराष्ट्र पोलीस न्यूज


गावठी हातभट्टी दारू वाहतुक करताना वाहन पकडले. 

मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. 

वडगाव निंबाळकर पोलीसांची कारवाई. 


पुणे (ता. बारामती) : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन जि.पुणे (पुणे ग्रामीण) 

गोपनीय माहितीच्या आधारे 

दिनांक १६/१२/२०२२ रोजी मौजे होळ ता.बारामती जि पुणे गावचे हद्दीत निरा नदीचे पुलाचे अलीकडे बाजुस एक महिंद्रा कंपनीची लाल रंगाची व पुर्ण काळ्या काचा असलेली स्कार्पिओ गाडी नंबर एम.एच/१२/सी.डी/५५५०, हि आढळून आली.

              अधिक चौकशी केली असता गाडीत गावठी हातभट्टीची तयार दारूचे ३५ लीटर मापाची काळे, निळे व पिवळ्या रंगाची १८ कॅन मिळून आले, एक कॅन अंदाजे किंमत ३५०० रूपये असे मिळून ६३,०००/-  रूपये व गुन्ह्यात वापरलेले वाहन अंदाजे किमंत ४ लाख असा एकुण ४,६३,००० /- माल जप्त करण्यात आला आहे,

         यात आरोपी नाव चेतन बाळु जाधव (वय २२) व दिनेश राजेंद्र आडके (वय २३), संदिप रमेश चौगुले (वय २१), सर्व रा. माळेगाव ता. बारामती जि पुणे, या तीन्ही आरोपीनी आपल्या ताब्यात असलेली अवैध दारू घेऊन वाहतुक करताना पकडले.

             त्याआधारे त्यांचेवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना देवकर २५६५ हे करीत  आहेत. तपासी अमंलदार पो ना देवकर व दाखल अंमलदार पो ना भोसले ७१७__

Post a Comment

أحدث أقدم