शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

७५१ ग्रामपंचायतीसाठी मतदान : निकाल २० डिसेंबर__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : गट, तट गावकी आणि भावकी यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडणुकीसाठी आता अवघा गावगाडा सज्ज झाला आहे.

         राज्यातील सुमारे सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे.

           सध्याच्या राजकीय वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकांनाही मोठे महत्त्व आले असून ग्रामपंचायतींवर कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. 

           राज्यातील अहमदगर, अकोला अमरावती औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि नाशिक या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. 



           निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी शनिवारी मतदान साहित्याचे वाटप केले. राज्यातील संवेदनशील गावांमध्ये स्थानिक पोलीसां बरोबर खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم