शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन एकाचा खुन


 सुशीलकुमार अडागळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (ता. बारामती) : हॉटेलच्या गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयावरून सुपे ( ता. बारामती) येथे श्रीराम भदुजी गहुकार वय- ४२, रा. अंजनगाव बारी ता. जि. अमरावती. यांना आरोपी मच्छिंद्र दत्तात्रय काळखैरे रा. काळखैरेवाडी ता. बारामती जि.ज्ञपुणे यानी दि.२/१२/२०२२ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास  सुपे ता.बारामती जि.पुणे गावचे हद्दीत हाँटेल श्रीकृष्णचे जवळ वाँशिंग सेंटर समोर लाकडी दांडक्याने केलेल्या जबर मारहाणीत श्रीराम गहुकार यांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.
         याबाबत विशाल श्रीराम गहुकार वय २१ वर्षे रा. अंजनगावबारी सेंट्रल बँके जवळ ता. जि.अमरावती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात  गु.र.नं  ४३७/२०२२  भादवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि. सोमनाथ लांडे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم