भाऊ वैजल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पालघर श (मोखाडा) : भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने मोखाडा कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य एल डी भोर यांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी वाचन खुप आवश्यक आहे आपल्या महाविद्यालतील ग्रंथालय हा विद्यालयाचा आत्मा असून मोठ्याप्रमाणावर पुस्तके ग्रंथ तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मात्र आपल्या विद्यार्थ्यांची ग्रंथालयात उपस्थित खुप नगण्य आहे ६०० मुलांसाठी २० हजार पुस्तके असतानाही वाचन संस्कृती वाढत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन वाढवावे कारण वाचाल तर वाचाल असे प्रतिपादन भोर यांनी यावेळी केले.
या ग्रंथालय प्रर्दशनाचे उद्घाटन पत्रकार हनिफ शेख यांच्या हस्ते झाले यांनी शेख यांनी पुस्तके माणसाला ओळख देतात. कारण मी एक पाव विक्रेता ते पत्रकार झालो ते फक्त पुस्तकामुळेच झाले पुस्तकामुळे क्रांती घडते. आपला चेहरा बदलत जातो मात्र आपली ओळख आपल्याला आयुष्यभर पुरते यामुळे कॉलेजवयातच वाचनाची गोडी लागणे आवश्यक आहे त्यातून जगणे समृद्ध होईल असे शेख यांनी सांगितले.मात्र सध्या तरुणांना वाचनाचे महत्व वाटत नसल्यामुळे ग्रंथालये ओस पडत चालली आहेत यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाचेही महत्व त्याची विशेषता शेख यांनी सांगितली.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक राजेंद्र घाटाळ सुत्रसंचालन प्राध्यापक पारधी सर यांनी केले यावेळी ग्रंथालय प्रमुख धावणे सर ,प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

إرسال تعليق