सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
मांजरी बुद्रुक : हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट अपंग संस्थेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय ननवरे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांना भेटुन चर्चा केली.
मांजरी परीसरातील दिव्यांग बांधवांना पुणे मनपाच्या कंत्राटी पद्धतीने ४ टक्के अनुशेष प्रमाणे कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळावी. यासाठी माननीय सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांना विनंती केल्यानंतर त्याच तत्परतेने सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी कार्यालयाच्या आवारामध्ये येऊन निवेदन स्वीकारले.
आयुक्त यांनी निवेदन स्वीकारताच सांगितले की आपली मागणी रास्त असून आयुक्त देखील याबाबत सहकार्य करतील. मांजरी परिसरातील दिव्यांग बांधवांची नावाची यादी कार्यालयात जमा करावी. नक्कीच प्रशासन यात लक्ष देऊन सहकार्य करेल असे सांगितले.
तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे विभागीय शाखा पुणे उपाध्यक्ष प्रकाश नवले प्रसंगी उपस्थित होते
याप्रसंगी जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे मांजरी बुद्रुक उपाध्यक्ष ओंकार अंकशे, शशिकांत राऊत, संतोष तोरणे, केतन कांबळे, अमोल हंकारे, आकाश पोपळे उपस्थित होते.

إرسال تعليق