शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे कर्णबधिर मुलांच्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे कर्णबधिर मुलांच्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २० जानेवारी २०२३ ला पार पडला. 

          शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपला महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन विविध गुणदर्शन आपली कला कौशल्य दाखवून नेत्र दीपक  सादरीकरण केले आणि पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 



             प्रमुख पाहुणे एअर मार्शल भूषण गोखले (भूतपूर्व उपप्रमुख, हवाई दल भारतीय सेना) तसेच विशेष अतिथी डॉक्टर सोनम कापसे (संस्थापक व संचालक टेरासीन कॉ‌र्प) उपस्थित होते. संस्थेचे सचिव मा. प्रा .कुलकर्णी सर, शाळा समिती अध्यक्ष मा. डॉ. श्रीमती अपर्णा मॉरिस , शाळेच्या प्रशासक मा. नेहा पेंढारकर मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरडे मॅडम यांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका श्रीमती शोभा होन्नाकोरे व श्रीमती वाघमारे यांनी केले.

           मुख्याध्यापिका सरडे मॅडम यांनी शाळेचा अहवाल सादर केला. आभार प्रदर्शन विशेष शिक्षिका श्रीमती सूर्यवंशी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत बोलून करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم