शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ट्रॅक्टरच्या धडकेत पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू__


 सुशीलकुमार अडागळे

महाराष्ट्र पोलिस न्युज 


पुणे (ता. बारामती) : बारामती तालुक्यातील चोपडज गावच्या हद्दीत जगताप वस्ती येथे चोपडज वाकी रोडवर (दि.०३) सकाळी साधारण  ११ वाजेण्याच्या दरम्यान धमेंद्र जीवधर काळे (वय ३६ वर्षे) धंदा मजुरी, रा. चोपडज ता. बारामती हे आपली मोटरसायकल नं एम एच १४ क्यु ३३७९ यावरुन आपला सावत्र भाऊ त्याची पत्नी प्रतिक्षा व मुलगा शौर्य असे कानडवाडी येथुन वाकी चोपडज रोडने घरी चोपडज कडे येत असताना ते जगताप वस्ती जवळ आलेवर चोपडज बाजुकडुन वाकी कडे जाणारा ट्रॅक्टर हा चुकीच्या बाजूने येवुन धमेंद्र जीवधर काळे यांचे सावत्र भाऊ चेतन याचे मोटर सायकलला  समोरुन धडक दिली. 

         मोटार सायकलवर बसलेला पुतण्या शौर्य वय ५ वर्षे हा गाडीवरुन खाली पडुन ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरुन जावुन तो जागीच मृत्यू झाला, ट्रॅक्टर चालक रोहन उर्फ दत्तात्रय रविंद्र साळवे रा वडगाव निंबाळकर ता बारामती जि पुणे याचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद व गुन्हा रजिस्टरी दाखल झाला आहे, 

        गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मे हु कोर्ट रवाना करुन गुन्ह्याचा पुढील तपास ए, एस,आय.खोमणे हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم