शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

७४ वा प्रजासत्ताक दिन के के घुले विद्यालयात उत्साहात संपन्न __मांजरी बुद्रुक


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : ७४ वा प्रजासत्ताक दिन के के घुले विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. कात्रज दूध उत्पादक संघाचे प्रमुख अध्यक्ष गोपाळ अण्णा मस्के पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

          इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आर एस पी संचलन सादर केले तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य प्रकार लेझीम नृत्य व धाडसी खेळ सादर केले. विद्यालयाचे प्राचार्य पाटील एस एस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.



          त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी दीपक दडस कराटे चॅम्पियन यांनी विद्यालयातील कराटे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यालयातील यावर्षी निवृत्त होत असलेल्या शिंदे एम. एन (उपशिक्षिका) यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

         प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व कात्रज दूध उत्पादक संघाचे प्रमुख अध्यक्ष माननीय गोपाळ अण्णा म्हस्के पाटील तसेच माजी पोलीस पाटील व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी नाना घुले पाटील, अंकुश आबा घुले पाटील, माजी सरपंच शिवराज आप्पा घुले पाटील, शैलेश म्हस्के, समीर दादा घुले पाटील, पांडुरंग घुले पाटील, स्वप्निल फुंदे, भास्कर दादा मार्कड, नवल दादा कुंजीर, विद्याधर भोसले, बाळासाहेब घुले, वैभव दादा शिरसागर, दीपक दडस तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم