सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (हडपसर) : साने गुरुजी शिक्षण संस्थेचे आदर्श विद्या मंदिर शाळा क्रमांक दोन महादेव नगर आणि एस. एम. जोशी विद्यालय हडपसर पुणे येथे दिनांक १२/०२/२०२३ रोजी ११:०० वाजता राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक व गोपनीय विभाग यांच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये इयत्ता ५ ते ७ वी पर्यंत विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ मार्गदर्शन देण्यात आले. तसेच गुड टच बॅड टच बालकांचे हक्क लैंगिक शोषण अनुषंगाने पोस्को कायदा यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी हडपसर पोलीस स्टेशनचे API जाधव मांजरी पोलीस चौकी अधिकारी हडपसर पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे ASI दिनेश शिंदे व मपोशी वैशाली शहादेव उदमले दामिनी पथक हडपसर मुंढवा तसेच शाळेचे मुख्याध्यापिका वर्षा शेंडकर व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.



إرسال تعليق