सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : अखेर राजे क्लबचा अनोखा निर्णय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने राजे क्लबने पुढाकार घेऊन शेवाळेवाडी ग्रामस्थांसाठी फाॅगिंग मशीन उपलब्ध करून दिले.
राजे क्लबच्या निदर्शनास असे आले की बरेच दिवस झाले शेवाळेवाडी व मांजरी परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाळ्यात ही समस्या अजून गंभीर होईल असे दिसते.
पुणे मनपा अधिकाऱ्यांशी खूप महिने पाठपुरावा केल्यानंतर १-२ दिवस धूर फवारणी झाली. परंतु पुढील काही महिने फवारणी होणे खूप गरजेचे आहे. तसेच शेवाळेवाडी मांजरी परिसरातील काही ठिकाणी व सोसायट्यांमध्ये अजिबात धूर फवारणी झालेली दिसत नाही म्हणून यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राजे क्लबच्या सदस्यांनी स्वखर्चातून फॉगिंग मशीन विकत घेऊन ती सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध केलेली आहे.
यासाठी शेवाळेवाडी ग्रामस्थांसाठी आपल्या परिसरात पुढाकार घेऊन फवारणी करून घ्यावी.
निर्धार_निस्वार्थी_समाजसेचा राजे_क्लब सदैव तत्पर असे राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष व शेवाळेवाडी ग्रामपंचातीचे माजी उपसरपंच अमित पवार यांनी सांगितले.

إرسال تعليق