सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे दि. २९ : पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य घेताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचा ठसा देवून अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
भ्रमणध्वनी क्रमांक अद्यावत केल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळाले याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सहकार्य करावे.

إرسال تعليق