स्वाती सुपेकर
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : खडकवासला धरणातून पिण्याच्या व शेतीच्या उपयोगासाठी पाणी सोडले जाते. परंतु जस जसे धरणभाग सोडून पाणी शहरी भागातून जाते तस तसे त्या पाण्यात विविधप्रकारचा कचरा व पाणी प्रदूषित होणारे पदार्थ वस्तू टाकल्या जातात. फुरसुंगी पुढे जो सगळा ग्रामीण भाग आहे. तिथे पर्यंत पाणी पोहचते. ज्या ठिकाणी पाण्याची खरच समस्या आहे तिथपर्यंत हे पाणी आरोग्याला, शेतीला हानिकारक असलेले पोहचत नाही.
आत्तापर्यंत संबंधित विभाग आणि प्रशासनाने या समस्यावर उपाय केलेत का?
खडकवासला धरणांमधून या कालव्या मध्ये शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सोडलं जाते. कालव्या परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
प्रश्न एक ना अनेक, पण कालवा कचरामुक्त कधी होणार पर्यावरण प्रेमी, राजकीय, संस्था, संघटना यांनी वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा केला. या समस्यावर प्रशासनाने कुठल्याही ठोस पावले उचलली नाहीत. परिसरातील नागरीकांची आरोग्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे कालव्याच्या परिसरातील नागरिकांनी व्यथा मांडली.
शहरी भागातून जाणार्या कालव्याचे निरीक्षण करून कालव्याचे पाणी कायमस्वरूपी कसे स्वच्छ व प्रदूषण मुक्त राहिल याकडे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

إرسال تعليق