शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अखिल भटके विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
अखिल भटके विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने व राष्ट्रीय अध्यक्ष दादा जाधव यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष आसिफ भाई खान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाबासाहेब यांना अभिवादन करण्यास आलेल्या नागरिकांना पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आला.
स्वयंरोजगार हात गाडी पाथरी चे सरचिटणीस राहुल दादा तायडे, बिग वुमन गाईचे अध्यक्ष जावेदभाई खान, अखिल भारतीय विमुक्त जाती जमाती महासंघचे जिल्हाध्यक्ष रंजीत दुपारगुडे, संघटनेचे सरचिटणीस मिथुन माने, संघटनेचे उपाध्यक्ष वसीम शेख संघटनेचे उपाध्यक्ष हबीब भाई शेख, शाहनवाज शेख संघटनेचे सदस्य संघर्ष चंदनशिवे, राम बिडकर, विनिता कांबळे, साहिल शेख इत्यादी व हजारो नागरिक हजर होते





إرسال تعليق