शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अक्षय तृतीयेच्या दिवशी सहदुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे नोंदणी महानिरीक्षक यांचे आदेश


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे, दि. २० : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी २२ एप्रिल २०२३ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत.

            अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याची नागरिकांमध्ये भावना असते. त्यानुसार नागरिकांना जमीन, सदनिका आदी खरेदी विक्री करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काही ठराविक सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सुरू ठेवावयाची कार्यालये निश्चित करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांच्या सह जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم