शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

उष्माघाताने होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या उष्माघातावरील उपचारांविषयी माहिती...


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्युज



पुणे : उष्माघातानंतर शरीराचे तापमान जास्त होते आणि नाडीचा वेग वाढतो. जर वेळेत उपचार मिळाले नाही तर उष्माघाताने मृत्यू देखील होऊ शकतो. शरीरात पाणी आणि मीठाची कमतरता निर्माण झाल्यास उष्माघात होतो. जाणून घ्या उष्माघाताने मृत्यू कसा ओढवू शकतो तसेच त्यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती.


              उष्माघाताने मृत्यू होण्याची कारणे ...


            जेव्हा बाहेरचं तापमान ४५ अंशाच्या पुढे जातं आणि शरीरात पाण्याचा अभाव असतो, तेव्हा शरीराचं तापमान ३७ अशाच्या पुढे जाऊ लागतं. शरीराचं तापमान जेव्हा ४२ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं Priy रक्तातलं प्रोटिन, स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात. रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना विशेषतः मेंदूला रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि मृत्यू ओढावतो.


            उष्माघातावरील उपचार...


👉🏻उष्माघात टाळायचा असेल, तर अति उन्हात जाणे टाळाच.


👉🏻उष्माघात झाल्यास थंड पाण्यात ओला कपडा किंवा कापूस भिजवून शरीरावर ठेवा. 


👉🏻यामुळे शरीराचे तापमान कमी होईल.


👉🏻उष्माघात झाल्यावर शरीराला मसाज करावा. यासाठी कोणतेही थंड तेल वापरू शकता. 


👉🏻या सोबतच शरीरावर बर्फ देखील लावू शकता.


👉🏻उष्माघात टाळायचा असेल, तर तुम्ही कांद्याची साल खिशात ठेवू शकता


👉🏻उन्हाळ्यात शक्यतो सैल आणि पातळ कपडे वापरा.


👉🏻शरीराचे तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.


👉🏻जेव्हा उष्माघात होतो तेव्हा जास्त पाणी प्या. जेणेकरुन शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होऊ शकेल.

Post a Comment

أحدث أقدم