सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : पोटाची खळगी भरण्यासाठी मांजरी परिसरात आलेल्या आदिवासी समाजातील कुटुंबाला आधार देण्याचे काम शैलेंद्र बेल्हेकर याच्या संस्थेने केले. हाताला मिळेल ते काम व दोन वेळ पोटभर जेवण मिळावे. यासाठी उन्हातान्हात काबाड कष्ट करणाऱ्या आदिवासी बांधवांना आपण मदतीचा हात पुढे केला याचा आनंद होत आहे असे बेल्हेकर यांनी सांगितले.
बेल्हेकर पुढे म्हणाले राज्यातील विविध जिल्ह्यातील आदिवासी भागातील महिला, पुरुष कामगार, ऊस तोडणी, कोळसा पाडणे, खोद काम करणे अशी कष्टाची कामे करण्यासाठी मांजरी परिसरात वास्तव्यास येत असतात. कष्टाची कामे करुन त्यांना खुप मोबदला मिळतो. दोन वेळचे चांगले पोटभर जेवण सुद्धा आदिवासी यांच्या नशीबात नसते. अशा वेळी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ही सामाजिक बांधिलकी जपत आपण सर्वांनी त्यांना जमेल तशी मदत केली तर त्यांना थोडासा आधार मिळेल बस इतकीच भावना या उदात्त हेतूने सामाजिक काम केले.
अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी अनिल बेल्हेकर, ओजस बेल्हेकर, मसा जाधव, दिलीप घुले, बसप्पा सुंटाले हे उपस्थित होते.


إرسال تعليق