सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : पुणे असे कुठ असतं व्हय ; आंबे ईएमआयवर (EMI) अर्थात हप्त्यावर मिळतील तर तुम्हाला खोटे वाटेल पण हे खरे आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गुरुकृपा ट्रेडर्सचे गौरव सणस या विक्रेत्याने ही कल्पना प्रत्यक्षात आणली असून त्यांनी चक्क हप्त्यावर आंब्याची पेटी विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
आंब्याचे दर गगनाला भिडलेले...
उन्हाळा आला की आंबा खाण्यासाठी लहान थोर असे सगळेच जण उत्सुक असतात. मात्र सुरुवातीच्या काळात आंब्यांची आवक कमी असते. त्यामुळे साहजिकच आंब्याचे दर हे गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे आंबे घेणे परवडत नाही. त्यातूनच त्यांना ईएमआयवर (EMI) आंबे विकावी अशी कल्पना गौरव सणस यांनी सुचली आणि त्यानंतर त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

إرسال تعليق