सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राध्यापकांनी अध्यापनात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस)च्या माध्यमातून ई- कंटेन्टचा वापर कसा करावा या संदर्भात झुम अॅपवर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत दुबई येथील 'बीएमसी सोल्युशन्स दुबई'चे संचालक दत्ता मांदळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. प्राध्यापकांनी अध्यापनात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस)च्या माध्यमाचा वापर करताना विद्यार्थ्यांसाठी फोल्डर तयार करणे, व्हिडीओज अपलोड करणे, लाईव्ह क्लासेस आयोजित करणे, नवीन असाइनमेंट व सगळ्यात महत्त्वाचा घटक असलेल्या ऑनलाईन परीक्षेबाबत कशी तयारी करावी याबाबत दत्ता मांदळे यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणात ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करावा लागणार असून एलएमएसचा वापर करून अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया अधिक प्रभावी करता येईल. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. एम. जे. खैरे, आय.क्यू.सी. समन्वयक डॉ. रमाकांत जोशी तसेच कनिष्ठ महाविद्यालय, व्यवसाय अभ्यासक्रम व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व ऑनलाइन उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी औटी यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.

إرسال تعليق