धनंजय काळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सोलापूर (माढा) : तालुक्यातील कुर्डूवाडी शहर येथील नगरपालिकेत राष्ट्रवादी सरचिटणीस माढा तालुका अध्यक्ष प्रणित भैया शिरढोणे यांच्या माध्यमातून महिलांसाठी शौचालय बांधण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
कुर्डूवाडी शहरामध्ये गर्दीचे ठिकाण असल्याने महिलांसाठी शौचालय कुठेही नसल्याने शौचालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.
राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्याकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे तरी नगरपालिकेतील अधिकारी पाणीपुरवठा अभियंता कोमलताई वावरे कर निरीक्षक स्वप्निल बाळेकर आस्थापना प्रमुख रवींद्र भांबोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी मयूर भैया कबाडे, अशोक साठे व विजय जाधव इतर कार्यकर्ते हजर होते.


إرسال تعليق