डॉ. गंगाराम उबाळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा (चिखली) : चिखली तालुक्यातील रोहडा येथे दि. १२ मे २०२३ रोजी पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीतील ग्राम रोहडा येथील तपोवन देवी मंदिर येथे असलेले लग्न समारंभातुन एक सहा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानुसार माहिती च्या आधारे पोलीसांनी तात्काळ नातेवाईकांचे मदतीने मुलीचा शोध घेतला. परंतु मुलगी मिळून न आल्याने मुलीच्या आई ने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अंढेरा येथे अप क्रं १३२/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल केला.
दाखल झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने सुनील कडासने पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथके तयार करुन दिनांक १३ मे २०२३ रोजी मंदिर परीसराची बारकाईने पाहणी केली.
मंदिराचे मागील बाजुस सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेले नाल्यामध्ये मुलीचा मृतदेह दगडाचे ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेल्या स्थितीत आढळून आला. गुन्ह्याचा प्रकार हा अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याचे दिसून आल्याने दाखल गुन्ह्यामध्ये भादंवि कलम ३०२, ३६४, २०१ प्रमाणे कामाप्रमाणे दाखल करणू आला. विलास यामावार, उपविभागिय पोलीस अधिकारी मेहकर तथा देऊळगावराजा जि बुलडाणा यांचे नेतृत्वात मेहकर आणि देऊळगाव राजा विभागातील आणि स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा व सायबर सेल बुलढाणा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध तपास पथके नेमुन पुढील तपास केला. असता या गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नसतांना तपास पथकांतील अधिकारी व अंमलदार यांनी तपासा दरम्यान मंदिर परीसरात व आजु बाजुचे गावांमध्ये सखोल तपास व गुप्त बातमीदारा कडुन, केलेल्या तपासा प्रमाणे दिनांक १७ मे २०२३ रोजी संशयीत आरोपी सदानंद भगवान रोडगे वय २४ वर्ष राहणार रोहडा, ता. चिखली जि. बुलढाणा यांस ताब्यात घेवुन,परिस्थिती जन्य पुराव्यांचे आधारे त्याचेकडे विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
यातील मयत पिडीत मुलीचे पोष्टमार्टम रिपोर्ट नुसार त्यामध्ये आरोपीने पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करुन, रुमालाचे सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली असल्याचे दिसून आल्याने कायदा व कलमां प्रमाणे पुढील अधिक तपास पोलीस करीत आहोत.
सुनील कडासने पोलीस अधिक्षक, बुलडाणा, बी.बी. महामुनी अपर पोलीस अधिक्षक, बुलडाणा विभाग अशोक थोरात, अपर पोलीस अधिक्षक खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विलास यामावार, उपविभागिय पोलीस अधिकारी मेहकर, देऊळगाव राजा अशोक लांडे, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्है श्री गणेश हिवरकर, ठाणेदार, पोलीस स्टेशन अंडेरा, अमित वानखेडे, सपोनि, स्था गु.शा. सानप, सपोनि सायबर सेल, सपोनि शरद आहेर, पोउनि किरण खाडे, पोउनि मनोज वासाडे, अंमलदार, पोहेको सिध्दार्थ सोनकांबळे, सपोफो गणेश देडे, पोना भारत पोफळे, पोना गोरख राठोड, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ नितीन फुसे, पोहेकॉ निवृत्ती पोफळे, पोना गणेश लोडे यांच्या टिमने कारवाई करण्यात आली.

إرسال تعليق