सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती पुनर्वसन केंद्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना मानसशास्त्राचे पुस्तके ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटीत द्वारे देखील ज्ञान मिळावे उद्देशाने क्षेत्रीय अभ्यास भेट आयोजित केली होती.
या भेटीत जागृती पुनर्वसन केंद्रामध्ये मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या सिझोफ्रेनिया, स्मृतिभ्रंश, व्यसनाधीनता, ऑटिझम, व्यक्तिमत्व विकृती आजार, नैराश्य, चिंता वेगवेगळ्या पेशंटच्या वॉर्ड ला भेट देण्यात आली.
जागृती पुनर्वसन केंद्राचे संस्थापक मानसोपचार तज्ञ डॉ. अमर शिंदे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मानसिक आजार व त्यावर केले जाणारे उपचार याबद्दल जागृती पुनर्वसन केंद्राचे संस्थापक मानसोपचार तज्ञ डॉ. अमर शिंदे यांनी माहिती दिली. सध्याच्या युवकांमध्ये वाढत असलेले व्यसनाधीनता घातक असून त्यावर लवकरात लवकर उपचार करण्याची गरज आहे. हॉस्पिटल मधील ऍडमिशन ची प्रक्रिया, पेशंट बरा होण्याची टक्केवारी, आपण आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी त्यांनी माहिती सांगितली. आजही मानसिक आजारी रुग्णांना मानसोपचारासाठी नेण्याचे प्रमाण कमी आहे, आपण आपल्या आजूबाजूला आणि नातेवाईकांमध्ये आढळणाऱ्या मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांना मानसोपचारासाठी घेऊन जाण्यास प्रोत्साहन करावे अशी आव्हान डॉ. अमर शिंदे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी देखील व्यसनाधीनता कमी होऊ शकते का? कोण कोणत्या प्रकारचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होतात? त्यांच्यावर उपचार कशा प्रकारे केले जातात? रुग्णाच्या मानसिक आजाराचा प्रकार कसा ओळखला जातो? रागावर नियंत्रण कसे मिळवावे? अशा विविध प्रश्न विचारत संवाद साधला. या शैक्षणिक भेटीसाठी कला कला शाखेतील मानसशास्त्र विभागातून प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील ६३ विद्यार्थी उपस्थित होते. या शैक्षणिक भेटीस विद्यार्थ्यांसोबत प्रा. अश्विनी डोके व प्रा. संगिता देवकर उपस्थित होत्या.



إرسال تعليق