शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कर्मयोगी व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे बिले २० तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : हर्षवर्धन पाटील


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज

पुणे (इंदापूर) : तालुक्यातील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल २० तारखे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असे संचालक मंडळाच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.

      क्ष५ जून पर्यंत निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या बिलाचा प्रश्न मार्गी लागनार असी माहिती निरा -भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांनी दिली. 

           इंदापूर अर्बन बँकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिली . यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते.

           पुढे बोलताना पवार म्हणाले की निरा-भिमा साखर कारखान्याच्या ऊस बिलाचा प्रश्न बाबत आज संचालक मंडळाची बैठक झाली आहे. प्रामुख्याने या बैठकीमध्ये कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या बिलाच्या प्रश्ना बाबत सखोल चर्चा झाली.

        यामध्ये प्रामुख्याने असे सर्वांचे एक मत झाले की आम्ही आतापर्यंत तोडणी चे सर्व बिल दिले आहे. मात्र यामध्ये काही शेतकऱ्यांची उसाची बिले राहिले आहेत ते सर्व ५ जून च्या आत मध्ये दिले जाणार आहे. तसा आमच्या सर्वांचा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे. जर ५ जून पर्यंत काही तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण झाल्यास त्यातून ही शंभर टक्के मार्ग काढला जाणार आहे.

          आम्ही या अगोदर १०ते ११ कोटी रुपये अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा केली आहेत. तसेच पुढेही १०/१५ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. यावेळी निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन कांतीलाल झगडे यांच्यासह सर्व संचालक मंडळातील संचालक  व  कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم