अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : संपुर्ण इंदापूर तालुक्यात सध्या चर्चेचा विषय म्हणजे. खरोखरच मोर्चा होता का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
काल दिनांक १७ तारखेला शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निरा- भिमा सहकारी साखर कारखान्यावर ऊस बिलाच्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. परंतु या मोर्चात शेतकऱ्यां पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पुढारी व कार्यकर्ते यांचीच गर्दी पाहण्यात आली.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्यातील अनेक शेतकरी सभासदांनी या मोर्चाकडे पाठ फिरवत दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष कृती समितीने निरा-भिमा साखर कारखान्यावरती ऊस बिलाच्या प्रश्नाबाबत मोर्चा काढला होता.
या मोर्चाला शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्तेच हजर झालेले होते. यावरुन हाच आंदाज सुज्ञ व सुजान नागरीकांनी लावला की नेमका हा मोर्चा शेतकर्यांचा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ? अशीच चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगलेली पहायला मिळत आहे.
कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते पुढे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, नियोजन समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य प्रामुख्याने आपापल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या घेऊन आले होते. हा मोर्चा जरी आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली असला तरी या मोर्चावर राष्ट्रवादिच्या कार्यकर्त्यांचाच पगडा दिसून येत होता.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पत्रकार बांधवांनी घेतल्या असता या मोर्चाशी काही संबंध नसल्याचे शेतकरी यांनी स्पष्ट सांगीतले. आमचा या कारखान्याला ऊसही नाही आणि या कारखान्याचे आम्ही सभासद ही नाही असे अनेक शेतकऱ्यांनी तोंड लपवत का होईना आपली प्रतिक्रिया दिला. अनेकांनी तर प्रतिक्रिया देण्याचे टाळले व या मोर्चातून माघारी पाय काढत घरचा रस्ता धरला. आम्ही पक्षाचा आदेश पाळण्यासाठी आलो आहोत.
मोर्चा जरी संघर्ष कृती समितीने काढला असला तरी या मोर्चाचे रिमोट कंट्रोल मात्र राष्ट्रवादीकडेच होते अशीच चर्चा आता रंगू लागली आहे.


إرسال تعليق