अमर सारणिकर
महाराष्ट्र पोलीस
लातूर : संपुर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी झिजवत आपल्या बहारदार आवाज आंबेडकरी चळवळीतील गित गात जगनारा प्रेमळ मन मिळावु, दिल खुलास स्वभावाचा गायक म्हनुन परीचित असलेले लातुर जिल्ह्यातील प्रमोद लोखंडे यांचे आल्पश्या अजाराने निधन झाले.
लातुर जिल्ह्यातील असे एक ही गाव नसेल की त्या गावात प्रमोद लोखंडे यांचा कार्यक्रम झाला नसेल. भिमा कोरेगाव नदीत उताना पडला बाजीराव, माझ्या भिमाच्या पुण्याईने बसाया लाल दिव्याची गाडी, आता झाले की पांढरे केस, मग आय कश्याला घालायची असे असंख्य भिम गिते आज प्रसिध्द आहेत.
अनेक लोक गीते देखील प्रमोद लोखंडे यांच्या आवाजात प्रकाशीत झालेली असुन अश्या या गोड गळ्याच्या गायकास संपुर्ण आंबेडकरी चळवळीतील जनतेच्या वतीने भावपुर्ण श्रधांजली

إرسال تعليق