शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महाराष्ट्राच्या दृष्टीदात्याची अग्निपरीक्षा : अनिलकुमार गित्ते


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज



पुणे : आपण जे काही शिकलो  आपणाला जी कला येते, जे शास्त्र येते त्याचा प्रत्यक्ष फायदा आपल्या देशातील, राज्यातील शेवटच्या व्यक्तीला व्हावा या भावनेपोटी दिवसरात्र स्वतःच्या सुख चैनीच्या त्याग करत अति महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या मोतीबिंदू आणि डोळ्या संबंधीच्या सुमारे १६५००० + शस्त्रक्रिया करत विक्रम निर्माण करणारे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने साहेब यांना सामान्य लोक मोठ्या प्रेमाने दृष्टीदाता ही उपाधी देतात.

   

       जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले 

तोचि साधू ओळखावा।  देव तेथिची जाणावा....!


           आजतागायत स्वतःचं कर्तव्य प्रामाणिकपणे करुन जनसामान्यांपर्यंत सेवेची गंगा वाहत नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशातील, राज्यातील कर्मयोगी लोकांना आपल्याच देशातील, राज्यातील काही कर्मठ लोक स्वत:च्या स्वार्थापोटी षडयंत्र रचुन त्रास देत असून त्याची अनेक उदाहरणं आपल्या सर्वांना माहीतच आहेत. 

              ...डॉ. लहाने जे जे हॉस्पीटलचे डीन असताना उपचारासाठी गावखेड्यातुन मुंबईला गेलेल्या सामान्य रुग्णांची कशी काळजी घेत होते हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहीलेले आहे. 

              एका छोट्याशा खेड्यात जन्म घेऊन अथक परिश्रमाच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी प्राप्त करुन आपण घेतलेल्या शिक्षणाचा, कौशल्याचा गोर गरीब सामान्य लोक जे की महाग महाग हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाहीत अशा सामान्य लोकांसाठी फायदा व्हावा, दृष्टिहीन लोकांना हे सुंदर जग दाखवण्यासाठी अहोरात्र राबणार्या अशा देवमाणासाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर हे आपल्या सर्वांचं दुर्दैवच म्हणावं लागेल. या महाराष्ट्रात नेहमी महान लोकांना त्रास देऊन त्यांचा मानसिक आत्मविश्वास दुखावण्याचा हेतु परस्पर प्रयत्न केला गेलेली आहे पण ज्या ज्या वेळी अशा पध्दतीने नीच लोकांनी राजकारण केले त्या त्या वेळी सामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन नक्कीच जाब विचारलेला आहे.

             फाटकं लुगडं , ठिगळ लावुन शिवलेलं धोतर घालुन उदास चेहरा घेऊन आलेल्या आणि उपचारानंतर नवं जगं पुन्हा आनंदाने पाहू शकणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो वृध्द चेहर्‍यावर समाधान आणि आनंदाचं हास्य डॉ. लहाने यांच्यामुळेच फुललेलं आहे. 

              मुंबई सारखं शहर सोडून गावोगावी मोफत मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया शिबिरं आयोजीत करुन डॉ. लहाने साहेबांनी जो कर्मयोगाचा महा ज्ञान या महाराष्ट्रात सुरु केलेला आहे तो कधीही अशा नीच राजकारणाला बळी पडून नामोहरम होणार नाही. डॉ. लहाने यांच्यामुळे ज्या हजारो कुटुंबांना नवीन रोशनी मिळाली, अजुनही मिळतेय आणि यापुढेही मिळत राहील ते सेवेचे व्रत कधीही शिथील होणार नाही. माझ्यासारख्या अनेक सामान्य युवकांचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि आदर्श आहेत. जो सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याच तोंडावर त्याचं कृत्य पडतं पण तळपत्या सूर्याचा प्रकाश तसूभरही कमी होत नाही. आरोप करणारे जे जे हॉस्पीटलमधील निवासी डॉक्टर मंडळी लहानेवर प्रेम करणारा सामान्य माणूस कधीही माफ करु शकणार नाही. 

                 कारण तुम्ही लोकांपासून त्यांची दृष्टी आणि दृष्टीदाता हिरावून घेण्याचा प्रयत्न केलाय...! हे शब्दांकन अनिलकुमार गित्ते यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم