अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील मालोजीराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गढीवरील ऐतिहासिक चिंचेच्या झाडावर आपले घरटे निर्मान करुन वास्तव्यास असलेल्या असंख्य परदेशी चित्रबलाक पक्षाचा बळी आज इंदापूर नगरपरिषदेतील रामराजे कापरे यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने असंख्य पक्षी बळी गेले.
इंदापूर मधील मालोजीराजे गढीवरील ऐतिहासिक चिंचेच्या झाडावर वास्तव्यास असलेल्या शेकडो परदेशी चित्रबलाक पक्षाचा बळी का घेतला चित्रबलाक पक्षाची अंडी, चित्रबलाक पक्षी त्यांची पिल्ले यांचा तरफडून मृत्यू झाला.
इंदापूर मधील संबंधित विभागांची दिरंगाई तर नगरपालिकेची घाईघाईत पक्ष्यांची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला.
पुरातन चिंचेचे झाड पाडल्याने वास्तव्यास असलेल्या शेकडो परदेशी चित्रबलाक पक्षी, पिल्ले यांचा तरफडून मृत्यू होत असताना पाहुन अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
मालोजीराजे गढीवर अनेक चिंचेचे झाडे आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्या चिंचेच्या झाडावर परदेशी चित्रबलाक पक्षी जून महिन्यामध्ये (प्रजनन) काळामध्ये ते त्या चिंचेच्या झाडावर आपली घरटे बांधून पिल्लांना जन्म देतात आणि प्रजनन काळ संपल्यानंतर ते पक्षी निघून जातात.
ऐतिहासिक चिंचेचे झाड जमीनदोस्त करून आणि त्यावर वास्तव्य करत असलेले शेकडो चित्रबलाक पक्षी, पिल्ले, अंडी याचा नाहक बळी घेतला आहे. या सर्व घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, पक्षी प्रेमी प्राध्यापक कृष्णा ताटे, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण, गफूरभाई सय्यद व विविध सामाजिक संघटना यांनी केली आहे. तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशी त्यांनी मागणी केली.
सर्व मृत व जखमी चित्रबलाक पक्षी, पिल्ले व अंडी आणि सोबत वटवाघळांना एका ट्रॅक्टरच्या टेलर मध्ये भरून इंदापूर मधील कचरा डेपो मध्ये पुरण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. या घटनेबद्दल पक्षिप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


إرسال تعليق