अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलिस न्युज
पुणे (इंदापूर) : दि. २२ रोजी इंदापूर शहरात संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयाचा एक दिवस मुक्काम असतो.
इंदापूर शहरातील साठे नगर येथील स्वर्गीय कै. मारुती सोनवणे (पाटील) मित्र परिवार यांच्या वतीने वारकऱ्यांना चहा नाष्ट्या व जेवणाची सोय करण्यात आली. यावेळी शेकडो वारकरी बांधवांनी याचा लाभ घेतला अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेचे मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी दिली. तसेच मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे हे नववर्षा पासुन हा उपक्रम राबवत आहेत.
यावेळी विलास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, विकास सोनवणे, सागर सोनवणे, समिर सोनवणे, दिग्विजय सोनवणे, सनी सोनवणे, मिलन सोनवणे, अजय सोनवणे, रवी सोनवणे, सुमित आरडे, सोमनाथ खंडाळे,अक्षय कुचेकर,अभिषेक कुचेकर, किशोर ढावरे यांनी परिश्रम घेतले.

إرسال تعليق