सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : दि.५ जून २०२३ रोजी पुणे शिवाजीनगर येथे पांचाळ सुतार समाज महाराष्ट्र राज्य यांच्या झालेल्या मिटींग मध्ये श्री विश्वकर्मा सुतार चॕरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या संस्थेची अधिकृत नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालय पुणे येथे झालेली आहे. त्या अनुषंगाने पांचाळ सुतार समाजाच्या कार्याला खर्या अर्थाने कार्य करण्यास सुरुवात झाली आहे असे सांगितले.
सदर ट्रस्ट ला ००००५८४/२०२३ असा नोंदणी क्रमांक प्राप्त झाला असून सुतार समाजाच्या विकास कामास या ट्रस्ट द्वारे गती प्राप्त होणार असून सुतार समाजातील विविध पायाभूत सुविधांवर ही ट्रस्ट भविष्यात भरीव कार्य करणार आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुतार समाज हा एकसंध होणास मदत होणार त्याच अनुशंगाने या ट्रस्ट मध्ये पांचाळ सुतार समाजाने सभासद होऊन कार्य करावे. असे मत ट्रस्ट च्या अध्यक्ष ॲड.कांचन वाळवेकर/ सुतार यांनी माहिती दिली.
ट्रस्ट च्या कामाबद्दल बोलताना राजेंद्र पंडीत व विठ्ठल जानेकर म्हणाले समाजकार्य करणे, सामाजिक सलोखा राखणे, शासकीय व निमशासकिय विविध योजनांची माहिती तळागाळातील सर्वांपर्यंत पोहचविणे, विविध विकासकामांचे माध्यमातून तळागाळातील बांधवांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविने. सर्व सुतार समाज एका छताखाली आणणे, ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबीर योजना राबविणे, अवयवदान संकल्पना राबविणे व त्याचा प्रसार, प्रचार करणे, महिला सशक्तीकरण करणेकामी आवश्यक त्या सर्व ठिकाणी ट्रेनिंग कॕम्प आयोजित करणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती करणे, अशा स्वरुपाची अनेक कामे ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
वरील पदाधिकार्यां व्यतीरिक्त ट्रस्ट मधे प्रकाश पिंपळकर, रविराज महामुनी, ज्ञानेश्वर बारवेकर, गणेश सुतार, सुवर्णा आव्हाड, स्वाती मोरे, इत्यादी पदाधिकारी ट्रस्ट मधे पुढील कामकाज पाहणार असून सुतार समाजाची कनेक्टीविटी व विकास यावर भर देणार आहे. असे सांगण्यात आले.
--अधिक माहितीसाठी संपर्क--
Adv. कांचन सुतार/वाळवेकर - ९२२६१२६७७७
सचिन पंडित - ९९२१९१६५५५
गणेश सुतार - ८८८८५७९५४५

إرسال تعليق