शुभांगी व वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
उस्मानाबाद (तुळजापूर) : तुळजापूर तालुका व शहरामधील अवैध मद्य विक्री बंद करणे बाबत तसेच १८ वर्षा खालील बालकांना विनापरवाना मद्य मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. असे निदर्शनास आल्यामुळे या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय तुळजापूर येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
तुळजापूर तालुका व शहरामध्ये सध्या मोठ्ठया प्रमाणात दारू व गुटखा विक्री होत असुन, तसेच १८ वर्षा खालील बालकांना कोणताही वयाचा पुरावा न बघता, तसेच विनापरवाना मद्य विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. तसेच दारू परवाना नसलेल्या हॉटेल, ढाबे या ठिकाणाहुन ही अवैध दारू विक्री होत आहे. अशा अवैध दारू विक्रेत्यांवर १५ दिवसाच्या आत योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा राज्य उत्पादन शुल्क कार्यालय तुळजापूर कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष धैर्यशील कापसे, महिला प्रदेश कार्याध्यक्ष मिना सोमाजी, महाराष्ट्र जनरल सेक्युरिटी सतीश लोंढे महिला जिल्हा उपाध्यक्ष उषा धाकतोडे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पात्रे, जिल्हा महासचिव किशोर वाघमारे, पृथ्वी जिल्हा सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, तालुकाध्यक्ष बालाजी जाधव, तालुका सचिव अखिलेश पुराणिक, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, महिला तालुका उपाध्यक्ष सुरेखा अडसूळ आदी पदाधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

إرسال تعليق