शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शेवाळेवाडी व मांजरी बुद्रुक येथील दोन्ही गावच्या व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे हडपसर यांच्या वतीने पोलीस काॅन्स्टेबल विजय ढाकणे यांचा सत्कार


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हडपसर) :  दि. २५/०६/२०२३ रोजी १८:४५ वाजताचे सुमारास हडपसर पोलीस स्टेशन कार्यरत असलेले पोलीस शिपाई क्रमांक 10550/ विजयकुमार ढाकणे हे रात्रपाळी कर्तव्य असताना त्यांच्या कुटुंबासह खासगी कामात शेवाळवाडी चौक येथे आले असता त्याच वेळी तीन अनोळखी इसमानी शेवाळवाडी चौक येथील चैतन्य स्वीट अँड सेंटर या मिठाईच्या दुकानातील सर्व काचेची कपाटे फ्रिज लोखंडी कु-हाडीने तोडफोड करुन दोघे मोटरसायकल वर पळून जात असल्याचे दिसले.

             ही घटना तात्काळ  फोन द्वारे कळवून PC ढाकणे यांनी एकट्याने वरिष्ठ यांना कळवून आरोपीतांचा पाठलाग सुरु केला. ही माहिती पोलीस स्टेशन चा wtsapp ग्रुप वर मिळताच सह पोलीस निरीक्षक डगळे, तपास पथक अधिकारी अंमलदार लगतच्या चौकीचे अंमलदार सह तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोशि विजय ढाकणे यांनी साधारण ६ किलो मिटर पाठलाग करत असताना आरोपी मोटरसायकल वर घसरून पडले. आणि उसात दोन दिशांना पळून गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी PC ढाकणे यांच्या लोकेशन सर्व स्टाफ पाठवून उसात लपलेला विधी संघर्षित बालक वय १७ वर्ष व गुन्हयात वापरलेली गाडी मो सायकल क्रमांक MH - 12 PU-6265  हिरो होंडा प्लस ही ताब्यात घेतली असून दुसरा आरोपी गौरव संतोष अडसूळ व १९ वर्ष राहणार कॉलनी नंबर ५ मोरे सोसायटीच्या समोर शेवाळवाडी हा पळून गेला असून घटनास्थळावरुन एक विधी संघर्षित बालक (नाव निष्पन्न आहे ) पळून गेला.

            दि २९/०६/२०२३ रोजी १२:०० वाजता हडपसर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपही जेरबंद करण्यात आले. 

             मांजरी आणि शेवाळवाडी या दोन्ही गावाचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व्यापारी यांनी उस्फुर्तपणे पोलीस स्टेशन येथे येऊन PC विजय ढाकणे यांचा सत्कार केला आणि पोलीस स्टेशनच्या टीमवर्क बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم