सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणारे रस्ते व त्यामधील अनियमत्ता आणि लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असल्याने महाजनहीत प्रतिष्ठानने आंदोलन करून लक्ष वेधले.
या आंदोलनाची दखल घेत पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निधीचा अपव्यय टाळण्याचे व गुणवत्ता पूर्ण काम करण्याचे आश्वासन दिले.
महाजनहीत प्रतिष्ठानच्या आंदोलनाची दखल घेतल्याने हडपसर उपनगर व पुणे शहरात होणारा निधीचा अपव्यय टळण्यास मदत होणार आहे. हडपसर मध्ये पालखी येण्यापूर्वी चांगले रस्ते खरवडून तसेच पुन्हा डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले यामध्ये पुणे महापालिकेने लाखो रुपयांची तरतूद केली चांगले रस्ते खोदले व वेळेत काम पूर्ण केले नाही. म्हणून महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीने येथील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यासह, माजी नगरसेवक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला होता.
या आंदोलनाची दखल घेत पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महाजनहित प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. बैठकीमध्ये मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता संदीप रणनवरे यांच्या समवेत चर्चा करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले.
यावर सकारात्मक विचार करून भविष्यात होणारे नुकसान टाळण्याबरोबरच चांगल्या दर्जाचे रस्ते करण्याबाबत ठेकेदारांना व संबंधित अभियंत्यांना सूचना दिल्या जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले तसेच हडपसर परिसरात रखडलेले रस्ते करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आदेश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रतिष्ठान च्या मागणीची दखल घेत तातडीने रस्ते डांबरीकरण चे काम सुरू करण्यात आले.
याप्रसंगी महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीने महासचिव हेमंत ढमढेरे, सहसचिव अशोक राऊत, संजय मेहता, शामराव शिंदे, विजय भाडळे, महेश ससाणे, सोनाली गोडसे, दिलीप लिंबळे, दिपाली कवडे, सविता घुले, बापू वाघ, ऍड पियूष राऊत, आदी उपस्थित होते. हडपसर व उपनगरातील रस्त्यांबाबत पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे भविष्यात जर चांगले रस्ते उकरून निधीचा अपव्य केला तर महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महासचिव हेमंत ढमढेरे यांनी दिला आहे.

إرسال تعليق