सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प (उन्हाळी शिबीर) चे आयोजन हडपसर गाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉल येथे दिनांक १५ ते ३ जून दरम्यान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांचा मार्फत आयोजित करण्यात आले होते.
या उन्हाळी शिबिरा मध्ये मनोरंजन, नृत्य कला, लेझिम, संस्कृत संभाषण, पोहणे, कराटे, योगासने, ध्यानधारणा व अध्यात्मिक संस्कार अशा विविध बाबींचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले. वय वर्ष ६ ते १८ पर्यंतच्या सर्व मुला-मुलींसाठी मोफत प्रवेश देण्यात आला होता..
या शिबिरास संस्कृत साठी अनघा टेकले, डान्स साठी रोहित भडके, स्विमिंग प्रशिक्षक मंगल नवसूते, योगा प्रशिक्षक खंडे नानासाहेब कृष्णा, रजनी लोखंडे, बालसंस्कार प्रशिक्षक कल्पना इनामदार, अनिता मोघडपल्ली, ड्रॉइंग साठी अनिल टेकले, कराटे प्रशिक्षक गिरीश बागलकोटकर, लेझीम प्रशिक्षक अनिता धाबेवार , स्टोरी टेलिंग साठी अंकुर उंबेकर, इंग्रजी प्रशिक्षक बालकृष्ण गोसावी या सर्वांचे स्मिताताई गायकवाड यांनी विशेष आभार मानून त्यांचे मानचिन्ह व शॉल देउन धन्यवाद मानले. यावेळी त्या विद्यार्थ्यांनी जे १८ प्रशिक्षण घेतले त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले..
तसेच शिबिरास सहभाग घेणाऱ्या सर्व मुला - मुलींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शिबिराचे व्यवस्थापन स्मितसेवा फाउंडेशन च्या स्वयंसेवकांनी उत्तम रित्या पार पाडले.

إرسال تعليق