स्वाती सुपेकर
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : कात्रज कोंढवा रोड वर नेहमी होणारे अपघात व त्यावर होणारे प्रशासनाचे दुर्लक्ष यासह कात्रज कोंढवा रोड करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला २०० कोटीचा निधी मिळणार कधी. यासाठी स्थानिक नागरिकांनी तसेच शिवसेना (ठाकरे गट) हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठा संखेने जनसमुदाय जमला होता. गोकुळ नगर चौक कात्रज कोंढवा रोड पुणे यासाठी आंदोलन करण्यात आले. नागरिकांच्या मुत्युस जबाबदार असलेल्या ना कर्त्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा या वेळी करण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार महादेव आण्णा बाबर, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, नगरसेविका संगीता ठोसर, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, गंगाधर आण्णा बधे, लक्ष्मण हाके, विश्वराज वाघमोडे, उपशहर प्रमुख युवासेना विकास बधे, प्रसाद बाबर, गणेश कामठे, श्रीकांत पवार, प्रदीप पवार, अमर कामठे, अनिल झेंडे, मुसाभाई पानसरे, सुनील लोणकर, शंकर लोणकर, सचिन कापरे, किरण ठोसर, प्रवीण ठोसर, रवी ठोसर, विद्या ताई होडे, सलमाताई परदेसी, रेणुका साबळे उपस्थित होते.


إرسال تعليق