शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

घाबरू नका, जाणून घ्या कारण.. तुम्हाला ही भारत सरकारचा मेसेज आला का?


 मुख्य संपादक - स्मिता बाबरे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : आज सकाळपासून नागरिकांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज येत आहे. याची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

          

      --महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना आवाहन..--


   ‌‌  सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे म्हणाले, “अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे. सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही.” असे स्पष्टीकरण दिले आहे.

        ‌‌    ही संकल्पना नागरिकाच्या हितासाठीच अमलात आणण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवित हानीचा धोका वाढत चालला आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.

           ‌‌दरम्यान, हा मेसेज जवळपास सर्वांना आलेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अद्याप याबाबत सरकारच्या वतीने कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आली नाही. म्हणून नागरिकांमध्ये गोंधळ व भीतीचे वातावरण आहे. आपला मोबाईल हॅक झाला आहे का, आपले पैसे कट होतील का. नेमका काय प्रकार आहे. आशा शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तयार झाल्या यावर हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. भीतीचे कारण नाही.

Post a Comment

أحدث أقدم