शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गुड टच बॅड टच या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (बारामती) : पुणे जिल्यातील बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत आज गोजुबावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच म्हणजे काय आपल्या शरीराचे खाजगी अवयव या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

          चौथीचे विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श म्हणजे काय व वाईट स्पर्श म्हणजे काय तो कोण करतो. असा स्पर्श केला तर घरी आईला जाऊन सांगायचे कोणावर ही विश्वास ठेवायचा नाही. कोणी दिलेला खाऊ घ्यायचा नाही. कोणाच्या गाडीवर बसून जायचे नाही. या कायद्याच्या अनुषंगाने व सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.

           अशा गुन्ह्यामध्ये निष्पन्न होणारा आरोपी हा जवळचा नात्याचा नातेवाईक असतो त्यामुळे ओळखीच्या व जवळच्या लोकांवर देखील विश्वास ठेवायचा नाही आई-वडिलांपासून काहीही लपवायचे नाही. अशा वेगवेगळ्या विषयांवर भोईटे मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केले.

Post a Comment

أحدث أقدم