शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महिला रोजगार प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न ; स्मिता गायकवाड


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हडपसर) ; हडपसर गाव येथे भव्य महिला रोजगार प्राशिक्षण शिबीर घेण्यात आले.. पुणे पोलीस आयुक्तालया, हडपसर पोलीस स्टेशन व कला क्रीडा साहित्य शांतिदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.. 

               या कार्यक्रमाचे आयोजन स्मितसेवा फाउंडेशन मार्फत करण्यात आले.. 

              यावेळी प्रमुख उपस्थिती ASI दिनेश शिंदे यांची होती.. कला क्रीडा साहित्य शांतिदूत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष योगेश जाधव, प्रशिक्षक व सचिव श्रीमती अनिता राठोड यांच्यामार्फत हे शिबिर घेण्यात आले.... 

             स्मितसेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष स्मिता गायकवाड यांनी या कार्यकामाचे आयोजन केले.  हडपसर परिसरातील सर्व महिलांना एकत्रित करून त्यांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हडपसर परिसरातील महिलांना घर बसल्या काहीतरी उद्योग मिळावा व त्यांना रोजगार मिळावा यासाठी त्याना आधुनिक मार्केट मधे चालणाऱ्या वस्तू बनविण्याचे ट्रेनिंग ग्रुप वाईज देण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र पोलीस न्युजशी बोलताना सांगितले

Post a Comment

أحدث أقدم